चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे पतीवर कुर्‍हाडीने वार करून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये एका पत्नीने पतीवर चारित्र्याच्या संशयावरून कुर्‍हाडीने हल्ला केला आहे. नंतर स्वतः नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी पत्नीचा मृतदेह ताब्या घेतला आहे. तर पतीवर जवळच्या इस्पितळात उपचार सुरू आहे.

चंद्रपुरच्या घुग्गुसजवळच्या नाकोडा भागात बबन सोयाम आणि त्यांची पत्नी अर्चना सोयाम राहत होते. आज सकाळी पत्नी अर्चना सोयाम यांनी चारित्र्याच्या संशयावरून पती बबनवर कुर्‍हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात बबन किरकोळ जखमी झाले. घरातला आरडाओरड ऐकून शेजारच्यांनी धाव घेतली. तेव्हा अर्चनाने तिथून पळ काढला आणि जवळच असलेल्या वर्धा नदीकडे जाऊन नदी पात्रात उडी मारली. त्यात तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी अर्चनाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.