जगाची लोकसंख्या @8000000000…!! दुपारी दीड वाजता झाला आठशे कोटीव्या बालकाचा जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अबब… 8000000000 हा आकडा बघून तुम्ही चक्रावला असाल. पण तो कोणत्याही प्रकल्पाच्या खर्चाचा नाही, ना कुठला टोल फ्री क्रमांक, तर तो आहे जगाच्या लोकसंख्येचा आकडा. आज दुपारी दीडच्या ठोक्याला एका बालकाचा जन्म झाला आणि जगाची लोकसंख्या तब्बल 8000000000 कोटीवर पोहचली आहे.

वाढती लोकसंख्या जगाची डोकेदुखी ठरत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते पुरते फेल ठरले असल्याचे वल्डोमीटर या संकेतस्थळाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. या वाढीकडे लोकसंख्येचा विस्पह्ट म्हणून पाहिले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या 800 कोटी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

सध्या जगाची लोकसंख्या 800 कोटी होती. ती पुढे 2030पर्यंत 850 कोटी होईल.
24 वर्षांत 200 कोटींची वाढ
जगाची लोकसंख्या गेल्या 24 वर्षांत 200 कोटींनी वाढली आहे. 1998मध्ये जगाची लोकसंख्या 600 कोटी होती. त्यात झपाटय़ाने वाढ झाल्याने 2010मध्ये 700 कोटी झाली. त्यानंतर गेल्या 12 वर्षांत ती 800 कोटी झाली आहे.

28 वर्षांनंतर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 50 टक्के लोकसंख्या केवळ 8 देशांत असेल असा अंदाज संयुक्त राष्ट्राने व्यक्त केला आहे. यात हिंदुस्थान, पाकिस्तान, फिलिपिन्स, मिस्त्र, कांगो, नायजेरिया, टांझानिया आणि इथिओपियाचा समावेश आहे.

लोकसंख्या वाढीचा कालावधी घटतोय
इसवीसनाच्या सुरुवातीला जगाची लोकसंख्या 20 कोटी होती. ती 100 कोटी होण्यास तब्बल 1800 वर्षांचा कालावधी लागला होता. त्यानंतर 100 कोटींवरून 200 कोटी होण्यास 130 वर्षे लागली होती. दरम्यान औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठय़ा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने आवघ्या 30 वर्षांत जगाची लोकसंख्या 200 कोटींवरून 300 कोटी झाली होती, तर त्यानंतर 14 वर्षांत 100 कोटीने लोकसंख्या वाढून 400 कोटी झाल्याचे दिसत आहे.