वॉरेन बफेट यांच्या कॅश स्टॉकचा विक्रम
अमेरिकन अब्जाधीश आणि मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवे इंकने आयफोन निर्माता ऍपलमधील सुमारे 50 टक्के हिस्सा विकला आहे. या विक्रीमुळे वॉरेन बफेट यांच्या कॅश स्टॉकने नवा विक्रम रचला असून कॅश स्टॉक विक्रमी 276.9 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 23.20 लाख कोटी रुपयांनी वाढला आहे. कंपनीचे किती शेअर्स विकले गेले याची निश्चित माहिती नाही. परंतु, प्राप्त माहितीनुसार दुसऱया तिमाहित बर्कशायरची ऍपलमधील गुंतवणूक 84.2 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 7.05 लाख कोटी रुपये शिल्लक आहे.
बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार
बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून पेटलेला हिंसाचार दोन आठवडयानंतर पुन्हा उफाळून आला आहे. आज झालेल्या हिंसाचारात तब्बपल 72 जणांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जखमी झाले. या घटनेनंतर बांग्लादेशात अनिश्चितकाळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेटदेखील बंद करण्यात आले असून हिंदुस्थान सरकारनेही या घटनेनंतर बांग्लादेशमधील हिंदुस्थानी नागरिकांनाही सुरक्षित स्थळी जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच येथील हिंदुस्थानी नागरिकांसाठी 88-0131307640 हा हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला.