केन तनाका ठरल्या जगातील सर्वात वयोवृ्ध्द महिला; गिनीज बुकमध्ये नोंद

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये केन तनाका या जपानमधील महिलेची जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून नोंद करण्यात आली आहे. जपानमधील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणूनही त्यांची नोंद करण्यात आली आहे. केन तनाका शनिवारी 117 वर्षे आणि 261 दिवसांच्या झाल्या आणि सर्वात जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून त्यांची नोंद करण्यात आली. या आधी या विक्रमाची नोंद नबी ताजिमा या जपानी महिलेच्या नावावर होती. एप्रिल 2018 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 117 वर्षे 260 दिवस होते. तनाका यांनी शनिवारी ताजिमा यांचा विक्रम मोडला आहे.

केन तनाका जपानमधील फुकुओका शहरातील एका नर्सिंग होममध्ये राहतात. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1903 मध्ये फुकुओकाजवळील वजीरो गावात झाला होता. तनाका यांना चॉकलेट आणि सोडा खूप आवडतो. गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याचा आनंद त्यांनी कोक आणि चॉकलेटसोबत व्यक्त केला. तसेच त्यांच्या चेहऱ्याचे छायाचित्र असलेला कुटुंबियांनी दिलेला टी शर्टही त्यांनी घतला होता. त्यांचे नातू इजी तनाका 60 वर्षांचे असून आपल्या आजीची प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे अनेक निर्बंध असले तरी आपली आजी जीवनाचा आनंद घेत असल्याचे ते म्हणाले. या वयातही ती उत्साही असल्याचे त्यांनी सांगितले. गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याने आजीला खूप आनंद झाल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या