शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मान्सूनपूर्व वरळी विभागातील विविध कामाची पाहणी केली. शिवाय तेथील समस्यांबाबतही रहिवाशांशी संवाद साधला. मान्सूनपूर्व कामांची पाहणी करण्याबरोबर आदित्य ठाकरे यांनी वरळीतील विविध समस्या समजून घेतल्या. यावेळी साईकृपा सेवा मंडळामागील समुद्रकिनारी लावलेल्या पाणी उपसा पंपाची पाहणी केली. वरळीतील वीर जिजामाता नगर परिसरातील गल्ल्यांमध्ये पडलेला राडारोडा, नाले सफाई इत्यादी मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली आणि वरळीतील 141 टेनामेंट बीएमसी चाळ परिसरात मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर राडारोडा जमा झाला आहे. त्यामुळे परिसरात पाणीदेखील साचत आहे. त्याबाबत नागरिकांशी संवाद साधला.