मंथन – शिशूंच्या दुधाचा बाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • योगेश मिश्र

कर्नाटक उच्च न्यायालयाने जन्म देणारी आई (जेनेटिक मदर) आणि पालनपोषण करणारी आई (फॉस्टर मदर) यांच्या एका खटल्यावर सुनावणी करताना स्तनपान हा घटनात्मक अधिकार आहे, असे म्हटले आहे. स्तनपानाचे असंख्य फायदे असून जन्मजात बाळासाठी त्याहून दुसरे पोषक आणि सुरक्षित असे काहीही नसते. असे असताना जगातील अनेक पंपन्या केवळ फायदा कमावण्यासाठी बेबी मिल्कची विक्री आणि प्रमोशन करत आहेत. बाळात कोरोना संसर्ग पसरू शकतो, अशी भीती दाखवून स्तनदा मातांना बाळाला दूध देण्यापासून परावृत्त केले आणि  बेबी मिल्क देण्याचा सल्ला दिला गेला. शिशूंच्या दुधाचा हा घातक बाजार रोखायला हवा.

स्नपान हा घटनात्मक अधिकार आहे. यावर चटकन विश्वास बसणार नाही. परंतु एखादे उच्च न्यायालय याबाबत स्पष्टीकरण देत असेल तर शंकेला वावच राहात नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने जन्म देणारी आई (जेनेटिक मदर) आणि पालनपोषण करणारी आई (फॉस्टर मदर) यांच्या एका खटल्यावर सुनावणी करताना स्तनपान हा घटनात्मक अधिकार आहे, असे म्हटले आहे. घटनेच्या कलम 21 मध्ये आईला हा अधिकार दिल्याचे म्हटले आहे. त्यापासून तिला दूर करता येणार नाही. तसेच नवजात बालकाही आईच्या दुधावर पूर्ण हक्क आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. घटनेबरोबरच आंतरराष्ट्रीय कायद्यातही त्याची तरतूद आहे. मानवाधिकाराच्या जागतिक जाहीरनाम्यात 1989 च्या बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय कन्वेन्शनच्या कलम 25 (2) नुसार नवजात बालकाला आईच्या दुधाचा हक्क प्रदान केला आहे. आईलादेखील आपल्या मुलाला दूध देण्याचा हक्क दिला आहे.

कर्नाटक न्यायालयातील प्रकरण काय होते? एका नवजात बालकाची रुग्णालयातून चोरी झाली होती. त्या महिलेने आपल्या मुलाला त्या पालक आईकडून परत देण्याची मागणी केली होती. अशा वेळी साहजिकच स्तनपानावरून वाद निर्माण झाला. जन्माच्या एक तासाच्या आत स्तनपान सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे आईतील दुधाचे प्रमाण वाढते. शिशूला त्याच्या इच्छेनुसार स्तनपान करणे गरजेचे आहे. नवजात बालकांसाठी आईचे दूध सर्वात महत्त्वाचे असते. ते अत्याधिक पौष्टिक असते. ते शिशूला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवते. कधी कधी स्तनदा मातांना आपल्या शिशूंना कोलेस्ट्रोम न देण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हा सल्ला चुकीचा आहे. कारण आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, बाळाला जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान करण्याचा सल्ला दिला आहे. बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान सुरू ठेवण्यास आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. कारण बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध सर्वोत्तम मानले गेले आहे. आईलादेखील यापासून फायदे आहेत. एका संशोधनानुसार सर्व शिशूंना सुरुवातीला सहा महिने केवळ आईचे दूध दिले असते तर दरवर्षी 15 लाख बाळांचा जीव वाचला असता. आईच्या दुधामुळे बाळाचे आरोग्यही चांगले राहाते आणि शारीरिक विकासही चांगला होतो. जनावरांचे दूध, नवजात फॉर्म्युला, पावडरचे दूध, चहा, गोड पदार्थ, पाणी आणि ब्रेकफास्टमध्ये दिलेले खाद्य हे आईच्या दुधाच्या तुलनेने कमी पौष्टिक असतात. आईचे दूध बाळाला सहजपणे पचते. नवजात शिशूंच्या सर्व गरजा आईच्या दुधातून पूर्ण होतात. पाणी आणि अन्य पेय हे सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या काळात बाळासाठी आवश्यक नाहीत. शिशूला आईच्या दुधाऐवजी अन्य खाद्य पदार्थ दिले तर अनेक आजाराची लागण होण्याची भीती राहते.

स्तनपान हे बाळाचा आणि लहान मुलांचा गंभीर आजारापासूनही बचाव करते. त्याअनुषंगाने आईचे दूध हे मुलांचे पहिले लसीकरण मानले जाते. कारण ते सर्व प्रकारच्या संसर्गापासून बाळाला सुरक्षित करते. या दुधाने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सर्वसाधारपणे स्तनपान करणारी मुले ही बाटलीचे दूध पिणाऱया बाळांपेक्षा अधिक कुशाग्र असतात. स्तनपानामुळे महिलेला किमान सहा महिन्यांपर्यंत गर्भधारणा राहण्याची शक्यता राहात नाही. बाळ सकाळ-संध्याकाळ स्तनपान करत असेल, तसेच शिशूला दुसरे कोणतेच खाद्य दिलेले नसेल तर कमी काळात दुसऱयांदा गर्भधारणा होण्याची शक्यता कमी राहाते. जोपर्यंत बाळ स्तनपान करत राहील तोपर्यंत मासिक पाळी सुरू होण्यास वेळ लागतो. एखादी आई चोवीस तासात 8 वेळेपेक्षा कमी स्तनपान करत असेल किंवा अन्य खाद्यपदार्थ देत असेल तर बाळ कमी प्रमाणात दूध घेईल.

जगातील अनेक पंपन्या केवळ फायदा कमावण्यासाठी बेबी मिल्कची विक्री आणि प्रमोशन करत आहेत. जगभरात बेबी मिल्कच्या एकूण बाजारापैकी 56.26 टक्के वाटा हा आशिया प्रशांत भागात आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे गरिबी आहे. हिंदुस्थानात 58 टक्के माता या पाच महिन्यांपर्यंतच स्तनपान करतात. जागतिक पातळीवरचे हे प्रमाण 43 टक्के आहे. देशातील 70 टक्के दुधाचा पुरवठा हा लहान आणि भूमिहीन शेतकऱयांना होतो. गेल्या पंधरा वर्षांपासून हिंदुस्थान दूध उत्पादनात आघाडीवर आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब या तीन प्रदेशात दूध उत्पादन सर्वाधिक आहे. पण हिंदुस्थानी पशू कल्याण मंडळाचे सदस्य मोहन सिंह अहलुवालिया यांनी देशात विक्री होणारे 68 टक्के दूध आणि त्यापासून तयार केलेले उत्पादन हे बनावट असल्याचे म्हटले होते. अशा वेळी बाळासाठी सर्वोत्तम दूध हे आईकडे असताना आणि कायद्यानुसार तो अधिकार असताना त्यापासून वंचित ठेवणे गैर आहे. बेबी फूड तयार करणाऱया पंपन्यांना फायदा होण्यासाठी शिशूंच्या दुधाच्या बाजाराला सवलत दिली जात आहे. कोरोना काळातही पंपन्या या शिशूच्या आरोग्याशी खेळत आहेत. पंपन्यांकडून आईवडिलांच्या भावनेशी व्यवहार केला जात आहे. हा बाजार बंद करण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

 

n ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेच्या अहवालानुसार, गरीब देशात यासाठी पंपन्यांकडून अभियान राबविले जात असून त्यात आईच्या दुधापेक्षा बेबी मिल्क फॉर्म्युला उत्तम असल्याचा दावा केला जात आहे. अशा प्रकारचे अभियान हे स्तनदा मातांना डोळ्यासमोर ठेवून राबविले जाते. ‘सेव्ह द चिल्ड्रन’ संस्थेने चार पंपन्यांची नावे घेतली. त्या पंपन्या छुप्या मार्गाने आणि बेकायदेशीरपणे मोहीम चालवतात. फिलिपीन्समध्ये केवळ 34 टक्के माताच मुलांना दूध देतात. कोरोना काळामुळे बेबी मिल्कला जगभर मागणी वाढली. इंटरनॅशनल बेबी फूड अॅक्शन नेटवर्कच्या मते, बाळात कोरोना संसर्ग पसरू शकतो, अशी भीती दाखवून स्तनदा मातांना बाळाला दूध देण्यापासून परावृत्त केले आणि  बेबी मिल्क देण्याचा सल्ला दिला गेला. या पंपन्यांच्या रडारवर हिंदुस्थान–पाकिस्तानसारखे देशही आहेत. बेबी फूडचा जागतिक बाजार हा 50.46 अब्ज डॉलरचा असून तो येत्या सहा–सात वर्षांत 109.20 अब्ज डॉलरचा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच दरवर्षी दहा टक्के वाढ.

 

 

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक आहेत.)