माझ्या वडिलांना नाही, तर योगींना लखनऊ सोडावे लागेल; मुनव्वर राणांच्या मुलीचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्याचप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. आता उर्दूचे प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या मुलीनेही योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली आहे. मुनव्वर राणा यांची मुलगी उरुशा राणा हिला काँग्रसने उमेदवारी देत निवडणुकीत उभे केले आहे.

योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आपण जनपद सोडू, असे विधान काही दिवसांपूर्वी मुनव्वर राणा यांनी केले होते. माझे वडील जनपद सोडून कोठेही जाणार नाहीत. मात्र, योगी आदित्यनाथ यांना लखनऊ सोडून परत गोरखपूरला जावे लागेल, असे उरुशा हिने म्हटले आहे. या निवडणुकीत जनमत स्पष्ट दिसत असून योगी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही. त्यामुळे माझे वडिलांना जनपद सोडावे लागणार नाही. मात्र, योगी यांना लखनऊ सोडून गोरखपूरला परत जावे लागेल, असे उरुषा राणा म्हणाल्या.

उरुशा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली आहे. अखिलेश यांनी मुसलमानांना धोका दिला आहे. त्यांची मुलगी एआऱसीविरोधातील निदर्शनांमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळी ती रस्ता भरकटली आहे, असे ते म्हणाले होते. त्यावरून त्यांची विचारसरणी आणि मनसीकता समजते, असे उरुशा म्हणाल्या. अखिलेश यादव यांनी कधीही मुस्लीमांच्या हिताचा विचार केलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

एनआरसीचा लढा कायम राहील. काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे, तसेच आपल्याला उमेदवारी दिली आहे, त्यावरून काँग्रेस मुस्लीमांसोबत आहे, हे दिसून येते, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस महिला आणि मुस्लीमांसोबत आहे.काँग्रेसने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आपण विजयी होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.