पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश विदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंचा लवकरच ऑनलाईन लिलाव होणार आहे. यातील वेगवेगळ्या वस्तूंच्या किंमतीही वेगवेगळ्या असणार आहेत.

patel-22

ज्यांची किंमत पंतप्रधान कार्यालय ठरवणार आहे. openauction.gov.in या संकेतस्थळावर या वस्तूंची खरेदी करता येणार आहे.

cycle-23

लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोदी यांना नेदरलँडच्या पंतप्रधानांनी भेट म्हणून दिलेली सायकलही आहे. तसेच पगडी पासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीपर्यंतच्या सर्व भेटवस्तू या लिलावात विक्रीस ठेवण्यात येणार आहेत. यातील प्रत्येक वस्तूची किंमत वेगवेगळी असेल. लिलावातून मिळालेल्या पैशांचा वापर कल्याणकारी योजनांसाठी करण्यात येणार आहे. मोदींना भेटलेल्या भेटवस्तूंची पहिल्यांदाच विक्री करण्यात येणार आहे.