काँग्रेसची पडझड रोखण्यासाठी युवक काँग्रेस सरसावली, लोकसभेच्या निकालावर करणार खुली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारून पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होऊन काँग्रेसची अधिक पडझड होऊ नये यासाठी युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांसोबत निवडणूक निकालावर चर्चा करून निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेबात नाराजी व्यक्त केली आहे. त्याचेच पडसाद राज्यातही उमटताना दिसत असून युवक काँग्रेसने राज्यातील पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी मुंबईत 3 जूनला निवडणूक निकालावर खुल्या चर्चेचे आयोजन केले आहे. निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ते कुठे कमी पडले, कोणत्या चुका झाल्या. विधानसभा निकडणुकीत युकक काँग्रेसची भूमिका काय?असेल याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

लोकसभेचा निकाल हा काँग्रेससाठी धक्कादायक आहे. काँग्रेस पक्ष कठीण काळातून संक्रमण करत आहे. अशाकेळी काँग्रेस परिवाराचे सदस्य या नात्याने कार्यकर्त्यांनी पूवीच्याच जिद्दीने, उमेदीने एकत्र येऊन विधानसभेच्या लढाईसाठी तयार व्हावे या उद्देशाने निवडणूक निकालावर खुल्या चर्चेचे आयोजन केल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले.