युटय़ूबचे डिसलाईक मोजता येणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युटय़ूबवर कुणी व्हिडीयो अपलोड केला की त्याला लाईक आणि डिसलाईक असे दोन्ही प्रकारचे प्रतिसाद मिळत असतात. व्हिडियोंना मिळणाऱया डिसलाईकमुळे व्हिडियो क्रिएटर्स त्रस्त होतात. मात्र येत्या काळात डिसलाईक काऊंट बंद होणार आहे. युटय़ूबचा तसा विचार सुरू आहे. म्हणजे व्हिडियोला डिसलाईक बटण दिसेल मात्र किती लोकांनी डिसलाईक केले ते दिसणार नाही. युटय़ूबने ट्विट करून लवकरच डिसलाईक काऊंट बंद केले जाणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भातील अपडेटचा स्क्रीनशॉटदेखील कंपनीने शेअर केला आहे. व्हिडीयो क्रिएटर्सच्या भल्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.