
यूटय़ूबने आपल्या प्लॅटफॉर्मवरून दहा लाखांहून अधिक व्हिडीओ हटवले आहेत. कोरोना व्हायरससंदर्भात चुकीची माहिती युझर्सपर्यंत पोहोचवली जात असल्यामुळे यूटय़ूबकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
कंपनीचे चिफ प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2020 पासून आतापर्यंत कोरोना व्हायरससंदर्भात चुकीचे माहिती देणारे 10 लाख व्हिडीओ हटवण्यात आले आहेत. यावर अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. हे व्हिडीओ हटवणे खूप महत्त्वाचे होते. कारण याद्वारे युझर्सपर्यंत चुकीची माहिती पोहोचत होती आणि युझर्स त्यावर विश्वास ठेवत होते. दर तिमाहीनुसार या व्हिडीओंना हटवण्यात आले असून या व्हिडीओंना दहापेक्षा कमी ह्यूज मिळाले होते.


























































