
राजकीय वैमनस्यातून महिलेच्या सांगण्यावरून सहाजणांच्या टोळक्याने शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेचे पदाधिकारी दीपक विजय मारटकर (कय 32, रा. गवळी आळी, बुधवार पेठ) यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गवळी आळीत घडली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दीपक हे शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे पुत्र होते. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अश्विनी कांबळे, महेंद्र सराफ, सनी कोलते, संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल श्रीनिवास रागीर यांच्यासह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मारटकर हे शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेनेचे पदाधिकारी होते. त्यांचे वडील दिवंगत विजय मारटकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. त्यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत दिवगंत विजय मारटकर आणि अश्विनी कांबळे परस्परविरोधी पक्षातून लढले होते. त्यावेळी वडिलांसाठी दीपक यांनी परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी परिश्रम घेतले होते. त्यामुळे विजय यांना जास्त मते मिळाल्याचा राग अश्विनीला होता. त्या रागातून अश्विनीच्या सांगण्यानुसार तिचा मित्र सनीने साथीदारांच्या मदतीने दीपकवर खुनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, डॉ. नीलम गोऱहे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
युवा सेनेचे कसबा पेठेतील पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खुनामागे असणाऱया सर्कांचा शोध घ्यावा तसेच आरोपींना मोक्का लावावा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी गृहमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दीपक मारटकर यांच्यावर 1 ऑक्टोबरच्या रात्री पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने हल्ला करून खून केला. मारटकर यांच्या मारेकऱयांना तत्काळ अटक कराकी. हे सर्व सराईत आहेत का? त्या अनुषंगाने चौकशी करावी असे लेखी निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांना डॉ. नीलम गोऱहे यांनी दिले.

























































