युवराज सिंग भडकला, पराभवाचे खापर फोडले संघ व्यवस्थापकावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा झालेल्या पराभवाचा सर्वांनाच धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या या पराभवामुळे माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग भडकला असून त्याने या पराभवाचे खापर संघ व्यवस्थापकांवर फोडले आहे. ‘चौथ्या क्रमांकासाठी संघ व्यवस्थापनाने एकही फलंदाज तयार केला नाही. ही गंभीर चूक आहे’, अशा शब्दात त्याने संघ व्यवस्थापनाला फटकारले आहे.

‘जर एखाद्या खेळाडूला चौथ्या क्रमांकावर खेळवले जात आहे तर तो दोन तीन इनिंग अपयशी ठरला तर त्याला संघातून काढणे चुकीचे आहे. रायुडूसोबत संध व्यवस्थापनाने जे केले ते चुकीचे होते. न्यूझीलंडविरोधात त्याने चांगला खेळ केला होता. मात्र त्यानंतर दोन तीन सामने त्याने खराब परफॉर्म केले त्यामुळे त्याला संघातून काढून टाकले. हेच रिषभ पंतच्या बाबतीतही घडले. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हा एकदिवसीय सामन्यात खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही त्या जागे साठी एक मजबूत दावेदार तयार करू शकला नाहीत, असे युवराजने एका मुलाखतीत सांगितले.