जयाचेनी संगे समाधान भंगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संध्या शहापुरे

कसं वागावं, यापेक्षा कसं वागू नये हे सांगणं अधिक परिणामकारक असतं. समर्थ आपल्याला हाच बोध करत आहेत. समर्थ म्हणतात, ‘आपल्या मनाला समजवा की भरकटवून  टाकणारी, विचलित करणारी संगत सोड, ज्याच्यामुळे तुम्ही कधीच समाधानी होणार  नाही.’ अशी संगतही करू नको , ज्यामुळे तुमचा अहंकार जोपासला जाईल. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनात असलेला राम भक्तीचा भाव, मनाचा सात्विक भाव ज्याच्यामुळे हिरावला जाईल अशीही संगत करू नये. मग ती सचेतन -अचेतन /व्यक्ती असो वा आभासी जग! कशीही असो तिचा त्याग करावा. कबीर म्हणतात, ‘एक घडी आधी घडी, आधी मे पुनी आध, कबीर संगत साधू की, कटै कोटी अपराध’ अगदी थोडा वेळ, थोडय़ापेक्षाही थोडा वेळ… त्यापेक्षाही कमी वेळ जरी सज्जनांची संगती लाभली, तरी कोटी दोष नाश पावतात. ‘सज्जन सो सज्जन मिले, होवे दो दो बात, गदहा सो गदहा  मिले, खावे दो दो लाथ।।’ वाईट आणि चुकीच्या व्यक्तींच्या सहवासात आपण क्षणात भरकटले जाण्याची जास्त शक्यता असते; उलट उत्तम संगत आयुष्यात आपल्याला ध्येयापर्यंत नेते. आयुष्य फार सुंदर आहे. ते आनंदाने व्यतीत करायचे असेल तर आपली संगत पुन्हा पडताळून पाहिली पाहिजे!  ?