
बंगळुरू पोलिसांनी एका मोठय़ा घातपाताचा कट उधळला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) एका दहशतवाद्याला कोलकाता येथून अटक करण्यात आली, तर बंगालच्या कूचबिहार येथून स्पेशल टास्क पर्ह्सने आयएसआयच्या संशयित एजंटांना अटक केली. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर हिंदुस्थानी सिमकार्ड आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
बंगळुरू पोलिसांनी आसफूल मलिक (25) या दहशतवाद्याला बंगळुरू येथील बोम्मासंद्रा औद्योगिक परिसरातून अटक केली. तो जिगनी येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याला 11 ऑगस्ट रोजीच अटक करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत आता माहिती उघड झाली आहे. तो तहरिक-ए-पाकिस्ताच्या एका सदस्याच्या संपका&त होता. त्यांचा हिंदुस्थान आणि पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करण्याचा कट होता, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी सांगितले. मलिक हा फेसबुकच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील इमरान हैदर नावाच्या व्यक्तीच्या संपका&त आला होता. हैदर हा टीटीपीचा द्दहशतवादी असल्याचा पोलिसांना संशय आहे. मलिकच्या मोबाईल फोनमधून हैदरसोबत झालेल्या संभाषणाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
बांगलादेशमार्गे सिमकार्ड पाकिस्तानात
बंगाल पोलिसांच्या एसटीएफने कूचबिहार जिह्यातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या तीन हस्तकांना अटक केली. राशिदुल हक, नूर नसीरुद्दीन अली आणि शफीकुल इस्लाम अशी त्यांची नावे आहेत. तिघेही आयएसआयचे अंडरकव्हर एजंट म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून हिंदुस्थानी सिमकार्ड आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ते हिंदुस्थानातील सिमकार्ड बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पाठवायचे.































































