पुणे- तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुणे शहरातून तडीपार केल्यानंतर वास्तव्य करणार्‍या एकाला कोंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आफताब उर्फ बडापाडा राजु पठाण (२२, रा गणेश अपार्टमेन्ट, भाग्योदय नगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. कोंढवा पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आरोपी पठाण हा शिवनेरी नगर परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार शशांक खाडे, विकास मरगळे यांना मिळाली. त्यानूसा पथकाने सापळा रचून पठाणला ताब्यात घेतले. तडीपारी कारवाई संपण्याच्या अगोदरच तो पुणे शहर हद्दीत मिळुन आला म्हणून त्याला अटक करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली अंमलदार अमोल हिरवे, राहुल वंजारी, अभिजित रत्नपारखी. जयदेव भोसले यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.