जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार; 48 तासांत 10 दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैनिकांचा दहसशतवाद्यांशी लढा सुरू आहे. शुक्रवारी एका चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. गेल्या 48 तासात हिंदुस्थानी सैन्याला 10 दशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

9 एप्रिल रोजी शोपिया जिल्ह्यात एक चकमक उडाली होती. एका मशीदीत काही दहशतवादी लपले होते. तर अवंतीपुरामध्ये एका चकमक उडाली होती. त्यात दोन दहशतवादी ठार झले. मृतांमध्ये गजवत ए हिंदचा म्होरक्या इम्तियाज शाह याचाही समावेश होता. या चकमकीत चार जवान शहीद झाले होते तर काही जवान जखमी झाले होते.

खबरदारीचा उपाय म्हणून शोपिया आणि पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. दक्षिण कश्मीरमध्ये सैन्यानकडून शोधमोहीम सुरू आहे. शोपियात झालेल्या चकमकीत तीन दहशतावादी ठार झाले होते. ठार झालेले दहशतवादी अल बद्र या दहशतवादी संघटनेचे होते अशी माहिती समोर येत आहे.