परभणीत गुरुकुलातील १०वीचा विद्यार्थी बेपत्ता

सामना प्रतिनिधी । परभणी

सुपरमार्केट येथील सरस्वती गुरुकूल मधील इयत्ता १०वीचा विद्यार्थी ऋषिकेश नामदेव सरकटे हा रविवार, २४ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात त्यांच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस तपास चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

सुपरमार्केट मधील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या बाजूला असलेल्या सरस्वती गुरुकूलातून हा ऋषिकेश सरकटे रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत होता. परंतु त्यानंतर मात्र तो अचानक गायब झाला. रविवारी दिवसभर आणि सोमवारी दुपारपर्यंत त्याची शोधाशोध करण्यात आली. परंतु तो कोठेच सापडला नाही. त्यामुळे नवा मोंढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी रितसर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार परभणी रेल्वेस्टेशन व बसस्थानकातील सीसी टिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या