अभिनेता ऋतिक रोशनने खरेदी 38 हजार चौरस फुटाचे घर, किंमत ऐकाल तर व्हाल हैराण

अभिनेता ऋतिक रोशन याने मुंबईतील जुहू वर्सोवा लिंक रोडवर सी फेसिंग घर विकत घेतले आहे. या घराची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. अद्याप ऋतिक कडून याबाबत काही सांगण्यात आले नसले तरी गेल्या आठवड्यात या घराचे फायनल डिल करण्यात आल्याचे समजते.

ड्युप्लेक्स पेंटहाऊस

ऋतिकचे हे घर ड्युप्लेक्स पेंट हाउस आहे. एका अलिशान इमारतीत 14 वा, 15 वा आणि 16 वा माळा घेऊन त्याने बंगला वजा ड्युप्लेक्स फ्लॅट तयार केला आहे. हा फ्लॅट तब्बल 38 हजार स्क्वेअर फिट आहे. तर त्याला साडेसहा हजार स्क्वेअर फिटचे टेरेस आहे. ऋतिक ने या घरा सोबतच बिल्डिंग मधल्या दहा पार्किंगच्या जागा देखील विकत घेतल्या आहेत. मुंबई मिरर ने याबाबत वृत्त दिले आहे

दर महिना आठ लाख भाडे भरतो.

गेल्या काही दिवसांपासून ऋतिक सिफॅ सिंग आलिशान घर शोधत आहे. त्याच्या जुन्या घरात काही काम सुरू असल्याने रोशन कुटुंब जून महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत आहेत. त्या घराचे भाडे दर महिना तब्बल साडेआठ लाख आहे.

जुने घर आहे तीन हजार चौ. फूटाचे

याआधीचे रितिका चे घर ही तीन हजार स्क्वेअर फूट चे असून फोर बीएचके आहे. त्या घरात दोन्ही मुलांना खेळण्यासाठी फुसबॉल टेबल, टेबल टेनिस आहेत. तसेच मुलांसाठी चॉकलेट वेंडिंग मशीन देखील बसवण्यात आली आहे. ते घर देखील सिफेसिंग हे काही दिवसांपूर्वी रितिक ची माजी बायको सुजान खान हिने रितिक च्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता

लवकरच येणार क्रिशचा चौथा भाग

ऋतिक आपल्याला क्रिश सिरीजचा चौथ्या चित्रपटात दिसणार आहे यादी तब्बल वर्षभरापूर्वी तो सुपर थर्टी या चित्रपटात दिसला होता त्यात त्याने प्रसिद्ध गणितज्ञ गणित तज्ञ आनंदकुमार यांची भूमिका साकारली होती

आपली प्रतिक्रिया द्या