
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीत एकूण 21 हजार 116 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. या यादीत 60 हजार 37 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले होते. यातील 34 हजार 260 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क केलेला नाही तर 24 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. 73 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.
दुसऱया यादीत 13 हजार 247 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले होते. यांपैकी 9 हजार 398 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून 15 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. तर 2 हजार 863 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधलेला नाही. या विद्यार्थ्यांना आता पुढील गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळणार नसून त्यांना विशेष फेरीतच कॉलेज अलॉट केले जाणार आहे. दरम्यान अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली आणि दुसरी फेरी त्याचबरोबर इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा मिळून आतापर्यंत एकूण 1 लाख 8 हजार 402 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

























































