उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील 30 वर्षीय तरुण नागेश काहला याने 19 वर्षांच्या मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्याची घटना दादर स्टेशनवरील गर्दीच्या पुलावर संध्याकाळी 7 च्या सुमारास घडली. मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली आणि जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने आरोपीला पकडले.
नागेश काहला हा त्यावेळी नशेत होता. या तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.