गुजरात दंगलीतील 22 आरोपींची निर्दोष मुक्तता

गुजरात दंगलीतील 22 आरोपींची आज पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंचमहल जिह्यातील हलोल येथील न्यायालयाने हा निकाल दिला. गोध्रा येथे 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्स्प्रेसचा डबा जाळण्यात आला होता. त्यात 59 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यात हलोल येथे दोन मुलांसह 17 जणांची हत्या करून मृतदेह जाळण्यात आले होते. याप्रकरणी 22 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. न्यायमूर्ती हर्ष त्रिवेदी यांनी याप्रकरणी निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यापैकी 8 आरोपींचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला आहे.