
गरीब असो वा श्रीमंत, हिंदुस्थानात लग्नसोहळ्यांवर मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च केला जातो. याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक लग्नपत्रिका पाहिल्यावर येतोय. गुजरातमधील एका व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी छापलेली आगळीवेगळी लग्नपत्रिका सध्या नेटिझन्सच्या चर्चेचा विषय ठरली आहे. या लग्नपत्रिकेचे वजन तब्बल चार किलो एवढे आहे. फिकट गुलाबी रंगाची ही पत्रिका एखाद्या बॉक्स सारखी दिसते. या पत्रिकेत एकूण सात पाने असून त्यात तीन दिवसीय लग्नसोहळ्याचे डिटेल्स दिले आहेत. पत्रिकेतील बॉक्समध्ये पाहुण्यांसाठी ड्रायप्रूट आणि चॉकलेटस्देखील आहेत. या लग्नपत्रिकेची किंमत तब्बल सात हजार रुपये आहे.

























































