उरणमध्ये ५०० लिटर गावठी दारूसह हातभट्टीचा कारखाना उध्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी।न्हावाशेवा

उरण पोलिसांनी बुधवारी सकाळी करंजा येथे छापा टाकून मोठी हातभट्टी उध्वस्त केली. यावेळी पोलिसांनी तब्बल पाचशे लिटर गावठी दारू जप्त केली. उरण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

करंजा आगरीपाडा येथे हा हातभट्टीचा कारखाना सूरू होता. पोलिसांना या बाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६२ हजार रूपयांची गावठी दारू पकडण्यात आली आहे. तर हातभट्टीचा कारखाना चालविणारा हितेन दामोदर म्हात्रे व चंदू अंबू कातकरी या दोघांना आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन वर्षापासून गावठी दारू विरोधात थंडावलेल्या पोलिसांच्या कारवाया पोलिस निरिक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी उरण पोलिस ठाण्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.