
अफीम बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्याला एकाला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून 82 हजारांचा 7 किलो दोडाचुरा जप्त करण्यात आला.
करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित ( 38 रा.धानोरी, पुणे मुळगाव-मुं. दुरासनी, तहसिल सोजत, जि- पाली, राज्य राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक दोन धानोरी परिसरात पेट्रोंलिग करीत होते. त्यावेळी एकजण अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) अंमली पदार्थ विक्री करीता येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून करणसिंहला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 6 किलो 790 ग्रॅम अफीमच्या बोंड्याचा जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, रोकडे, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, आझीम शेख, जगदाळे, योगेश मांढरे, दीशा खेवलकर, बास्टेवाड यांनी केली.




























































