बटाटा गडगडला, किलोला दोन रुपयांचा भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

कांद्यापाठोपाठ एपीएमसी मार्केटमध्ये आज बटाटाही गडगडला. बटाटय़ाच्या तब्बल 100 गाडय़ांची आवक झाल्याने बटाटय़ाचे भाव चांगलेच कोसळले असून किलोला अवघा दोन रुपये भाव मिळला आहे. हा सर्व बटाटा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आला असल्याने वाहतुकीचा खर्चही निघाला नाही.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये वेअर हाऊसमध्ये साठवून ठेवलेल्या बटाटय़ाची आवक एपीएमसी मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. आज सकाळी मार्केटमध्ये बटाटय़ाच्या 80 गाडय़ा आल्या. दुपारी हा आकडा थेट 100 च्या पुढे गेला. परराज्यातून येणारा हा बटाटा एका गाडीमध्ये कमीत कमी 25 टन असतो. त्यामुळे आवक थेट अडीच हजार टनांच्या पुढे गेली आहे, असे कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.