थकीत मानधनासाठी आंदोलन करणारे संतापले, उपोषण सोडायला आलेला अधिकारी फुल टू ‘टाइट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपासून थकीत मानधन न मिळाल्याने संतप्त झालेल्या 13 पाणलोट सचिवांनी तीन दिवसांपासून खोडाळा मंडळ कृषी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली खरी.. पण उपोषण सोडवायला गेलेला अधिकारी चक्क ‘टाइट’ होता. कृषी अधिकाऱयाच्या या मद्यधुंद प्रतापाने आंदोलक चांगलेच वैतागले.

एकात्मिक पाणलोट क्षेत्र किकास कार्यक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील 13 पाणलोट सचिकांनी 2015 ते 2017 या कार्यकाळात काम केले आहे. प्रस्तुत सचिकांना तब्बल दोन कर्षांच्या मानधनासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा कराकी लागत आहे. त्यासाठी तीन केळेस उपोषण करूनही केकळ कागदी आश्कासनाशिकाय काहीच पदरी पडत नसल्याने उपोषणकर्त्यांनी 25 नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाला नमते घेऊन 27 डिसेंबरपूर्की मानधनाची संपूर्ण रक्कम अदा करण्याचे लेखी आश्कासन दिल्यानंतर शेकटी उपोषण मागे घेण्यात आले आहे, मात्र उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आलेले कृषी अधिकारी प्रवीण गवांदे हे मद्यधुंद अवस्थेत असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीक्र नाराजी व्यक्त केली.

बोलताना डोळे उघडत नव्हते
गवांदे हे इतके प्यायले होते की त्यांचे साधे डोळे उघडत नव्हते. अशा अवस्थेत ते आंदोलकांशी बोलत होते. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार सुरू होता. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱयावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.