
कोरोनाशी लढण्यासाठी दिल्लीसह अनेक राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीसारख्या शहरांत प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. दिल्लीचे प्रदूषण मीटवर नेहमई लाल किंवा पिवळ्या रंगात दिसत होते ते आता हिरव्या रंगात आले आहे.
दिल्लीकरांमुळेच दिल्लीचे प्रदूषण वाढत होते हे समोर आले आहे. राजधानीत अशी हवा फक्त ऑगस्टच्या महिन्यात दोन तीन दिवसांसाठी दिसते. मुंबई आणि पुण्यातही प्रदूषण कमी झाले आहे.
Pollution monitoring map & air quality index मध्ये फार कमी वेळा दिल्ली हिरव्या रंगात दिसते. इथे नेहमीच हवा प्रदूषित असते. परंतु जेव्हापासून दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. तेव्हापासून हवेचा स्तर सुधारला आहे. हवेच्या प्रदुषणाचे अभ्या करणारी संस्था सफरने दिलेल्या माहितीनुसार २४ मार्च रोजी दिल्लीतील हवेचा स्तर सामान्य होता. दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २१ तारखेपर्यंत हवेचा स्तर खूपच खालावला होता.




























































