
बॉलिवूडमध्ये केला जाणारा स्ट्रगल हा एक खूप मोठा आणि आव्हानात्मक मार्ग असतो. या मार्गावर जाण्यासाठी प्रचंड मानसिक-भावनिक ताकद लागते. तिथपर्यंत जाण्यासाठीचा रस्ता अजिबातच सोपा नसतो. या रस्त्यावर चालताना अनेकदा नकारात्मक पर्याय सुचू शकतात. असाच एक खुलासा बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे.
या अभिनेत्रीचं नाव मृणाल ठाकूर असं आहे. मृणालने आतापर्यंत सुपर 30, लव्ह सोनिया अशा चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. तिने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत मृणालने आपल्याला कधीकाळी आत्महत्या करावाशी वाटत असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
मुंबईतील एका कॉलेजमध्ये बीएमएमसाठी तिने प्रवेश घेतला होता. वास्तविक तिच्या आई वडिलांना तिने डेंटिस्ट व्हावं असं वाटत होतं. पण, जेव्हा मृणालला जाणवलं की तिला जे हवंय ते हा कोर्स करून मिळणार नाही. तेव्हा तिला नैराश्याने घेरलं होतं. तिला आत्महत्या कराविशी वाटत असल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलं आहे.
मुंबईत राहणं हे एक खूप मोठं आव्हान होतं. आपण यशस्वी झालो नाही तर आपलं काय होणार या विचारांनी मी हैराण व्हायचे. मला वाटायचं की माझं 23व्या वर्षी लग्न होईल आणि मग मुलं होतील. मला हे सगळं नको होतं. मला काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली, असं मृणालचं म्हणणं आहे.
आता मृणाल शाहीद कपूरच्या जर्सी या चित्रपटातून झळकणार आहे. एका दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट आधी 31 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असून अद्याप नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.






























































