
संपत्तीच्या वादातून मुलाने वृद्ध आईवर हल्ला केल्याची घटना माहीम येथे घडली आहे. हल्ल्यात इनाशिन जोसेफ मास्करेन्हस या जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी माहीम पोलिसांनी जोसेफ मास्करेन्हसला अटक केली आहे. तक्रारदार या माहीमच्या जहागीरबाग येथील इमारतीत राहतात. गेल्या काही दिवसांपासून इनाशिन आणि जोसेफमध्ये वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री त्या दोघांमध्ये वाद झाला. जोसेफने लाकडी बांबूने इनाशिनला मारहाण केली.
या मारहाणीत त्या जखमी झाल्या. या घटनेची माहिती समजताच माहीम पोलीस घटनास्थळी आले. इनाशीनवर भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मारहाणप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंद करून जोसेफला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
























































