कोयनेत मगरींचे प्रमाण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटण तालुक्यातील शेतकऱयांनी आजपर्यंत बिबटे, गवे, रानडुकरे आणि वानरांचा उपद्रव सहन केला आहे. आता कोयना नदीत मगरींचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळे सुपने, तांबवेपासून कोयना धरणापर्यंतच्या कोयना नदीकाठाला शेती करणारे शेतकरी व नदीमध्ये मच्छीमार व्यवसाय करणाऱया लोकांमध्ये मगरीची दहशत निर्माण झाली आहे. या मगरींचा बंदोबस्त वन विभागाने करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव कांबळे यांनी दिला आहे.

वन्यप्राण्यांमुळे शेतकरी आपल्या शेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी जाण्यास घाबरत आहेत. आपल्या शेतामध्ये ते पिके घेऊ शकत नाहीत.

कोयना धरणाच्या भिंतीपर्यंत मगरींचा वावर काढला असून, मच्छीमारी करणारेही नदीमध्ये मच्छीमारी करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी व मच्छीमार व्यवसाय करणाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता त्यांनी करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. यापूर्की गाकातील वाडीवस्तीवर असणारी कुत्री बिबटय़ाने फस्त केले आहेत. शेतकरीव मच्छीमार व्यवसाय  करणाऱ्यांना संरक्षण देणे ही वन किभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे वन किभागाने कोयना नदीतील मगरींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी बबनराव कांबळे यांनी पत्रकात केली आहे.