
नववर्षाचे जंगी सेलीब्रेशन सुरू असताना मुंबईमध्ये पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. (सर्व फोटो – गणेश पुराणिक, मुंबई)

मुंबई शहर, उपनगरामध्ये पहाटे पावसाला सुरुवात झाली.

मुंबईतील दादर, प्रभादेवी, वांद्रे, गोरेगाव, घाटकोपर, साकीनाका, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द परिसरामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.

नववर्षाची धूम सुरू असताना पावसाने अचानक हजेरी लावल्याने सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

प्रभादेवी पुलाजवळ पाणी साचल्याने चाकरमान्यांना कसरत करत पाण्यातून मार्ग काढावा लागला.

अनेकांनी पुलाच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढत धोका पत्करत कार्यालय गाठले.






























































