
इराण युद्धामुळे जगभरात युरियाचा तुटवडा होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे युरिया निर्यातबंदी शिथिल करण्याची विनंती हिंदुस्थानने चीनकडे केली आहे. आखाती देशांकडून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये खतांचे कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे खतांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. चीन युरियाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. गेल्यावर्षी चीनने हिंदुस्थानला काही प्रमाणात युरिया पुरवला होता. यावर्षी चीनने निर्यातीसाठी साठा खुला केलेला नाही. त्यामुळे हिंदुस्थानने चीनला निर्यातबंदी शिथिल करण्याची विनंती केली आहे.


























































