
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू वर्षी आंबा हंगामात नैसर्गिक संकटामुळे आंबा बागायतदार मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असून यात आंबा बागायतदार यांच्या न्याय्य मागण्यासाठी आंबा बागायतदार संघाच्या वतीने जाहीर मेळावे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पार पडला. व त्याच्याच एक भाग म्हणून 23 मार्च रोजी मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे आंबा बागायतदार काजू बागायतदार संघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड शहर व आजूबाजूच्या परिसरात देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची तपासणी व अन्य माहिती घेतली जात आहे. देवगडच्या परिसरात देवगड पोलिस स्थानकाच्या वतीने कडेकड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र महाडिक, गणपती गावडे, प्रभारी होमगार्ड समादेशक प्रसाद कदम,होमगार्ड सुधाकर नाईकधुरे,प्रदीप राणे, श्रीराम साईंम,दत्ताराम झाजम कासम झारी यांनी सहभाग घेतला होता.



























































