
इराणवरील अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांबद्दल चकार शब्द न काढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः फोन केला. आखातातील युद्धानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ‘‘होर्मुझची सामुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली राहावी. सर्व देशांना तो मार्ग वापरता यावा व तेथून ये-जा करणाऱ्या जहाजांना संरक्षण मिळावे यासाठी काय करता येईल याबाबत ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली,’’ असे मोदींनी सांगितले.





























































