ट्रेंड – ‘दिल्ली से मनाली’वर किली पॉलचा भन्नाट डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किली पॉल हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलीवूडसह हिंदुस्थानातील काही भाषेतील अनेक गाण्यांवर त्याने भन्नाट नृत्य करत लोकांची मने जिंकली आहेत. आता त्याने आणखी एका गाण्यावर अफलातून डान्स केला आहे. ‘दिल्ली से मनाली’ या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या गाण्यावर त्याने ठुमके लगावले आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत किली पॉल हा त्याच्या पारंपरिक वेशात दिसतो. गाण्यावर नाचताना त्याच्या चेहऱयावरचे हावभाव आणि पदलालित्य सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्याच्या व्हिडीओवर तेवढय़ाच भन्नाट प्रतिक्रिया नेटकऱयांनी दिल्या आहेत.