Chandrapur News वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड, व्याघ्र पर्यटनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, वाढत्या व्याघ्र पर्यटनामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम होत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. करवा वनक्षेत्रातील एका व्हिडिओमध्ये वाघ पाहण्यासाठी पर्यटकांच्या वाहनांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. वाहनांची गर्दी पाहून वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यटनातून महसूल मिळत असला तरी वन्यजीवांच्या शांततेला आणि नैसर्गिक वर्तनाला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. या घटनेमुळे व्याघ्र पर्यटनाच्या नियोजनाबाबत आणि वनविभागाच्या धोरणांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.