
चंद्रपूरच्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात पाण्याचे स्त्रोत आटल्यानंतर वनविभागाने विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. ताडोबा बफर भागातील मोहर्ली वन परिक्षेत्रात वढोली बीटात तयार करण्यात आलेल्या अशाच एका कृत्रिम पाणवट्यावर मोठ्या संख्येत वन्यजीवांची गर्दी बघायला मिळत आहे.
प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असले तरी ते वन्यजीवांपर्यंत पोहोचवण्यासाठी वनविभागाची धडपड आहे. पावसाळा लांबल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाणवट्यापर्यंत कॅनद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र या सर्व वन्यजीवांना सहजपणे उपलब्ध होणारे पाणी त्यांच्यासाठी जीवन ठरले आहे.

























































