
तृणमूल काँग्रेसच्या 28पैकी 20 खासदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र देण्यात आल्याचे खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले. तृणमूलच्या बंडखोर खासदारांची आज खासदार शताब्दी रॉय याच्या निवासस्थानी बैठक झाली. सुखेंदू शेखर यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.





























































