
‘माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे होर्डिंग्ज आणि बॅनर लावू नका’, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले.
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शनिवार, 13 जून रोजी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हे आवाहन केले आहे.
‘दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तुम्ही होर्डिंग्ज व बॅनर न लावता त्यावर होणारा खर्च टाळून समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम घेतले तर मला त्याचा अधिक आनंद होईल’, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.




























































