FIFA World Cup 2026 – पॅराग्वेविरुद्ध अमेरिकेच्या मोहिमेचा प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहयजमान अमेरिका आपल्या फिफा वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात शनिवारी पहाटे पॅराग्वेविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. उभय संघांमध्ये झालेल्या अलीकडील लढतींमध्ये अमेरिकेने वर्चस्व राखले आहे. अमेरिकेने पॅराग्वेविरुद्धचे सलग तीन सामने जिंकले आहेत. 2011 नंतर पॅराग्वेला अमेरिकेविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. मात्र, घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे अमेरिकेवर विजयाची मोठी जबाबदारी असेल.

पुलिसिककडून अमेरिकेला आशा

ख्रिस रिचर्ड्स आणि अँटोनी रॉबिन्सन यांचे किरकोळ दुखापतीमुळे खेळणे संदिग्ध असले, तरी अमेरिकेसाठी दिलासादायक बाब म्हणजे स्टार खेळाडू ख्रिस्तियन पुलिसिक पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. 2022 विश्वचषकात अमेरिकेच्या प्रत्येक गोलमध्ये योगदान देणारा पुलिसिक पुन्हा एकदा संघाचा मुख्य आधार असेल.