स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, डॉ. सेजल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाद्वारे कथित अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित व प्रसारित केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, डॉ. सेजल पवार आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमाशी संबंधित काही व्हिडीओ व क्लिप्स यूटय़ूब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांबाबत, संमतीबाबत आणि मृत व्यक्तींबाबत अश्लील, आक्षेपार्ह व अनुचित टिप्पणी असल्याचा आरोप आहे. अशा प्रकारची सामग्री समाजमान्य मूल्यांच्या विरोधात असून फौजदारी कायद्यांतर्गत कारवाईस पात्र ठरते. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोरेसह त्याच्या अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोप काय?

महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासात असे आढळून आले की, एका क्लिपमध्ये हिमांशू जांगरा यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या क्लिपमध्ये डॉ. सेजल पवार यांनी मृत पुरुषांच्या देहांबाबत आणि शैक्षणिक उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय शवांबाबत अश्लील व अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप आहे.