26 पैकी 23 उमेदवार बिनविरोध राज्यसभेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेच्या 26 पैकी 23 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात एनडीएच्या 19 तर काँग्रेसच्या चार उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्र, तामीळनाडू, राजस्थान, मणिपूर, मेघालय, अरुणाचलमधील उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकच्या चार जागांपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत, तर एक जागा एनडीएच्या खात्यात गेली आहे. गुजरातमधील सर्व चार तर मध्य प्रदेशात तिन्ही जागा भाजपकडे गेल्या. तर, आंध्र प्रदेशमध्ये तीन जागी टीडीपी तर एका जागी जनसेनेच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. 3 जागांसाठी 18 जूनला मतदान होईल.

मीनाक्षी नटराजन सर्वोच्च न्यायालयात

माहिती लपवल्याच्या कारणावरून अर्ज बाद करण्यात आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले आहे. त्यांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच, त्यांच्या विरोधातील उमेदवार महेश केवट यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली आहे.