
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आणि दिग्गज नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचे शुक्रवारी दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. राणा यांच्या निधनाने क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. ‘नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’चे (NRAI) अध्यक्ष कलिकेश नारायण सिंग देव यांनी राणा यांच्या निधनाबाबत माहिती दिली.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’ (ISSF) विश्वचषकानंतर घरी परतत असताना त्यांची प्रकृती बिघडली. दिल्लीत पोहोचल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे नवी दिल्ली विमानतळावर दाखल होताच त्यांना साकेत येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. मॅक्स रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



























































