Jammu Kashmir – सरावादरम्यान पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर ग्रेनेडचा स्फोट, दोन जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शुक्रावरी सराव सत्रादरम्यान ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तात्काळ लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमेजवळील भागात जवान प्रशिक्षण सराव करत असताना ही घटना घडली.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा यंत्रणा आणि लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आहे. स्फोट नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू केला आहे. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या भागात यापूर्वीही प्रशिक्षण आणि लष्करी कारवाईदरम्यान ग्रेनेडच्या अपघाती स्फोटांच्या अशाच घटना घडल्या आहेत.