
राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि मंदसौरच्या माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्याविरोधात नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने देखील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
मोदी जी के बारा साल!
देश के बारा बज गये!! https://t.co/MQOcATOuwz— Sanjay Raut (@rautsanjay61) June 12, 2026
मध्य प्रदेशमध्ये पुरेसे संख्याबळ नसताना देखील भाजपकडून तिसऱ्या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. दरम्यान मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर भाजपचे तीनही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्व प्रकरावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
देशभरात सध्या भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचे सेलिब्रेशन सुरू आहे. या सेलिब्रेशनवरून संजय राऊत यांनी पंतप्रधानांना जोरदार टोला लगावला आहे. ”नरेंद्र मोदींच्या बारा वर्षात देशाचे बारा वाजलेयत”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला.




























































