ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी FIR दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोलकाता येथील नेताजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तुषार कांती दास नावाच्या व्यक्तीने कोलकात्यातील नेताजी नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ममता बॅनर्जी यांनी ९ मार्च रोजी कोलकाता येथील एस्प्लानेड भागातील मेट्रो चॅनेलवर आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात केलेली विधाने “दोन समुदायांमध्ये शत्रुत्व आणि द्वेष वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात,” असा आरोप करण्यात आला आहे.