1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिजिटल व्यवहारालाचालना देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सध्या संपूर्ण राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला गती देण्यात आली आहे.  राज्यातील जवळपास 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत आहे.