
अभिनेत्री गिरीजा ओक ही सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. गिरीजाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीनंतर तिचे साडीतले फोटो देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. नुकतंच गिरीजाने फिकट सफेद रंगाच्या साडीत एक फोटोशूट केले आहे. या साडीसोबत तिने जांभळ्या रंगाचा ब्लाऊज आणि मोठे कानातले घातले आहेत. अगदी सिंपल पण तितकाच सुंदर असा तिचा लूक पाहून चाहते पुन्हा एकदा क्लिन बोल्ड झाले आहेत. या फोटोसोबत तिने साँवरिया देख जरा इस ओर… अशी कॅप्शन दिली आहे.






























































