Ratnagiri News – अखेर रत्नागिरीत पावसाचे आगमन; पाणी टंचाईचे संकट दूर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडक उन्हाळा आणि पाणी टंचाईचे भीषण संकट असल्याने सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. अखेर सोमवारी दुपारनंतर रत्नागिरीत पावसाने दमदार आगमन केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढील काही दिवस पावसाने कोकणात दमदार बरसण्याची गरज आहे.

यंदा पावसाने विलंब केल्यामुळे भात शेती संकटात सापडली आहे. दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणी साठा आटला आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात २५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. वेळ पडल्यास मृत साठा उपसण्याची वेळ नगरपरिषदेवर येणार आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची वाट पाहत असताना सोमवारी रत्नागिरीत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.